पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात कार्यरत असलेले दोन अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचं कार्यालय असून, सोमवारी दोन्ही अधिकारी बेपत्ता झाले. अधिकारी बेपत्ता होऊन दोन तास लोटले आहेत. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पाकिस्तानाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. पाकिस्तानमधील इस्लाबाद येथे भारतीय दूतावास कार्यालय आहे. या कार्यालयात कार्यरत असलेले दोन अधिकारी सोमवारी अचानक बेपत्ता झाले. अधिकारी बेपत्ता झाल्यानंतर दोन तासांनी ही घटना समोर आली. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं बेपत्ता अधिकार्यांचा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला आहे. भारताने 31 मे रोजी पाकिस्तानी उच्चायोगातील दोन कर्मचार्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचार्यांना रविवारी अटक करण्यात आली होती. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली होती. अबिद हुसैन, ताहीर खान आणि जावेद हुसैन अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव होती. ते थेट आयएसआयच्या संपर्कात होते. आयएसआय पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला होता.
यापूर्वी 2016 साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकार्याची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील अधिकार्याचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
भारतीय अधिकार्याने बनवलेल्या व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे दिसत होता. तसेच अहलुवालिया यांच्या घराबाहेर एक कार आणि बाईकस्वार उभा असल्याचं दिसत त्या व्हिडीओत दिसत होतं.